Accident News: कुरकुंभ (पुणे) : मनमाड-बेळगाव राष्ट्रीय महामार्गावरील कुरकुंभ घाटाच्या चढावर एसटी बस व खडी वाहतुकीचा टेम्पो यांच्यात झालेल्या अपघातात ६ जन जखमी झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी (ता. १५) सायंकाळी हा अपघात झाला आहे.टेम्पोAccident News:
टेम्पो यांच्यात झालेल्या अपघातात ६ जन जखमी झाल्याची घटना घडली आहे.
रामभाऊ फकिरा माळी (वय -६०, रा. देवळली, ता. भूम, जि. उस्मानाबाद), रतन शिवाजी कारंडे (वय ५५, रा. गोंदी, ता. इंदापूर), शंकर हरिश्वर नवले (वय – ७०, रा. कंदर, ता. करमाळा), सुलताना ख्वाजा मोमीन (वय – ५५), आशा चंद्रभान सोनवणे (वय- ५०, दोघी रा. निगडी, पिंपरी-चिंचवड),Accident News: टेम्पोचालक सुरज मुरलीधर जाधव (वय २६, रा. जाधववस्ती, जिरेगाव, ता. दौंड) अशी अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.Accident News:
मिळालेल्या माहितीनुसार, मनमाड-बेळगाव राष्ट्रीय महामार्गावरील कुरकुंभ घाटाच्या चढावरून टेम्पो हा दौंड बाजूने जात होता, तर परळ आगाराची मुंबई-अहमदपूर बस कुरकुंभकडे निघाली होती. मनमाड-बेळगाव राष्ट्रीय महामार्गावरील कुरकुंभ घाटाच्या चढावर एसटी बस व खडी वाहतुकीचा टेम्पो यांच्यात धडक झाली. त्यात बसमधील पाच प्रवासी व टेम्पोचालक जखमी झाले.Accident News:
यावेळी जखमींना दौंड येथील उपजिल्हा ग्रामीण व खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच दौंड एसटी आगाराचे व्यवस्थापक शिवाजी कानडे, वाहतूक निरीक्षक प्रतीक अनाके यांनी घटनास्थळी भेट दिली. रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.Accident News:
दरम्यान, कुरकुंभचे पोलिस हवालदार एस. एम. शिंदे, संजय नगरे, सागर म्हेत्रे यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास कुरकुंभ पोलिस करीत आहेत.Accident News: