बुलढाणा : समृध्दी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील पिंपळखुटा गावालगत विदर्भ ट्रॅव्हलचा भीषण अपघात झाला असून ट्रॅव्हल्स मधील २५ प्रवाशाचा होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यात चार मुलांचाही समावेश आहे.
शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विदर्भ ट्रॅव्हल्स ही ३० जून रोजी सायंकाळी ५ वाजता नागपूर वरून पुण्याच्या दिशेने जात होती. १ जुलै च्या रात्री दीड वाजण्याच्या सुमारास विदर्भ ट्रॅव्हल्सच्या धावत्या गाडीचे समोरील टायर अचानक निघाल्याने ट्रॅव्हल्स समृद्धी महामार्गावरील पुलावरील दुभाजकाला धडकून पलटी झाली.
पलटी झाल्यानंतर ट्रॅव्हल्सने काही मिनिटामध्ये पेट घेतला. त्यानंतर गाडीचा स्पोट होवून संपूर्ण ट्रॅव्हल पुर्णपणे जुळून खाक झाली. या ट्रॅव्हल्समधील २५ प्रवाशांचा मृत्यू झाला.
बुलढाण्याचे डेप्युटी एसपी बाबुराव महामुनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘बसमधून २५ जळालेले मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. एकूण ३२ प्रवासी या ट्रॅव्हल्समधून प्रवास करत होते. त्यातील ६ ते ८ लोक जखमी झाले आहेत. जखमींना बुलढाणा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.