Accident इंदापूर, (पुणे) : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर एसटी बस आणि मारुती इको कारचा झालेल्या अपघातात ८ जन जखमी झाल्याची घटना घडली असून यामध्ये दोघांची प्रकृती गंभीर आहे. लोणी देवकर (ता. इंदापूर) गावच्या हद्दीत हा अपघात झाला आहे.
गजानन थिटे (वय ६५), गौरी गजानन थिटे (वय ५५), नथुराम गजानन थिटे (वय ३५), निवेदिता नथुराम थिटे (वय २६), ऋत्विक नथुराम थिटे (वय ४, सर्व रा. बहे, ता. रोहा), ओम वय (०८), भगवान आबाजी तुपकर (वय ६१) आणि भारती भगवान तुपकर (वय ५०, सर्व रा. मुठवली खुर्द, ता. रोहा, जि. रायगड) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. यातील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार..!
तळेगाव आगराची बस पुणे- अक्कलकोट मार्गे निघाली होती. दरम्यान इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर गावचे हद्दीत एसटीचा डाव्या बाजूचा टायर पंक्चर झाल्याने चालकाने बस रस्त्याच्या कडेला उभा केली होती. तर मारुती इको कार चालक पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने येत होता. टायर बदलत असताना पाठीमागून वेगात आलेल्या मारुती इको कारने एसटीला जोरदार धडक दिली.
दरम्यान, दोन जण गंभीर जखमी असून इतर किरकोळ जखमी असल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे. या अपघातानंतर इंदापूर पोलीस मदत केंद्राचे पोलीस कर्मचारी, इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार आणि त्यांचे सहकारी यांसह इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी अपघातस्थळी भेट देऊन जखमींची विचारपूस करत मदतकार्य केले आहे.