राजगुरुनगर : जमिनीची नोंद सातबाऱ्यावर होण्याकरिताच्या आदेशाला मंजुरी मिळवून देण्याच्याबदल्यात याने ५० हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी राजगुरुनगर-खेड तहसिल कार्यालयाततील अव्वल कारकुनाला रंगेहाथ पकडले आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांननी कुरुळे या गावी एक तुकडा बंदीची जमीन खरेदी केली आहे. त्या जमीनीची नोंद सातबारा उत्ता-यावर होण्याकरीता व त्याप्रमाणे नोंदणीचा आदेश मिळण्यासाठी तक्रारदार यांनी राजगुरुनगर खेड तहसिल कार्यालयास रितसर अर्ज केला होता.
तक्रारदार यांनी त्याकरीता असणारी शासकीय रक्कम चलनाने भरलेली होती. अव्वल कारकून रमेश वाल्मिकी (वय ५१ वर्ष, पद अव्वल कारकुन, राजगुरुनगर-खेड तहसिल कार्यालय, ता. खेड, जि. पुणे. (वर्ग-३)) यांनी सदरचा आदेश मंजूर करून देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे ५० हजार रुपयांचेच्या रुपयांची मागणी केली होती. यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागानकडे तक्रार केली होती.
सदर तक्रारदार यांच्या तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष केली असता, लोकसेवक रमेश वाल्मिकी यांनी तक्रारदार यांच्याकडे ५० हजार रुपयांची मागणी केली होती, तडजोडीअंती २० हजार रुपये रक्कम देण्याचे ठरले त्यानंतर रमेश वाल्मिकी यानं तक्रारदार यांच्याकडून २० हजार रुपये लाच घेतल्याचे पंचासमक्ष स्विकारल्यावर त्यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्या विरुद्ध सखेड पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ से कलम ७, ७ अ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे, पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे तपास करत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र, मा. अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे, ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुर्ण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.