Pune Crime News : पुणे : लग्नाचे (marriage) आमिष दाखवून महिलेवर शारीरिक संबंध (Sexually Assaulted) ठेवले. तिचे अश्लील फोटो (obscene photos) काढून ते सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल करायची धमकी दिली. लग्नाचे विचारल्यावर जीवे मारण्याची धमकी (Kill Them After Asking) देऊन जातिवाचक शिवीगाळ (Caste abuse) केल्याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी (Sinhagad Road Police) चौघांवर अनुसूचित जामी व अनुसूचित जमातीअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)
धायरी येथील एका महिलेने दिली फिर्याद..
दयानंद निळोबा फंड, विश्वजीत दयानंद फंड (रा. शिरुर) यांच्यासह दोन महिलांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत धायरी येथील एका ३८ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी व दयानंद फंड हे ओळखीचे आहेत. दयानंद याने फिर्यादी यांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवले. त्यावेळी फिर्यादी यांचे नग्न फोटो काढले. ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केला.
दरम्यान, विश्वजीत याने जीवे मारण्याची धमकी देऊन इतरांनी जातिवाचक शिवीगाळ करून सार्वजनिक ठिकाणी अपमानित केल्याने या महिलेने सुरुवातीला शिरुर एमआयडीसीकडे तक्रार केली होती. तेथून ती सिंहगड रोडला वर्ग करण्यात आली असून पोलिस निरीक्षक राजूरकर तपास करीत आहेत.
Pune Crime News | जून्या वादातून तरुणावर ब्लेडने केले गालावर वार, बोपोडी परिसरातील घटना..
Pune Crime : गाडीच्या काचा फोडून चोऱ्या करणाऱ्या परप्रांतीय टोळीच्या आवळ्या मुसक्या..