कोलकाता : आयकर विभागाने पश्चिम बंगालमध्ये ६ ठिकाणी ही छापेमारी केली आहे. यामध्ये कोलकाता येथील एका व्यवसायिकाच्या घरी ईडीला तब्बल ७ कोटीच घबाड सापडले आहे.
ईडीने वाहतूक व्यावसायिक निसार खान यांच्या घरी धाड टाकली होती. तेव्हा त्यांच्या घरी पलंगाखाली ५०० आणि २ हजारच्या नोटांचे घबाड सापडले आहे. हे पैसे मोजण्यासाठी अधिकाऱ्यांना कॅश मोजण्याची मशीन मागवावी लागली. त्यांच्या घराबाहेर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ईडीकडून या पैशासंदर्भातील चौकशी सुरू आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने वेगवेगळ्या ठिकाणी धाडसत्र सुरू केले आहे. कोलकातामध्ये ३ ठिकाणी छापेमारी करण्यात आली. मोबाईल गेमिंग फ्रॉड प्रकरणी ही छापेमारी करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.