अहमदनगर : रागाच्या भारत अनाथालयातून निघून गेलेल्या तरुणीला जेवणाचे आमिष दाखवून त्या तरुणीवर काही तरुणांनी बलात्कार केल्याची घटना अहमदनगरमध्ये घडली असून ही घटना उघडकीस येण्यासाठी अनेक महिले उलटले आहेत.
अहमदनगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोदं करण्यात आली असून आरोपी शोधण्याचे आणि पुरावे संकलित करण्याचे मोठे आव्हान पोलिसांच्या समोर असणार आहे.
अहमदनगर मधील एका अनाथालयात राहणारी ही तरुणी रागाच्या भरात १४ जुलै रोजी अनाथालय सोडून गेली होती. त्यानंतर ती तरुणी शिर्डी मंदिराच्या परिसरात एकटीच राहत होती.
दिवाळीच्या काही दिवस आधी रात्रीच्या वेळी काही तरुण तिच्याजवळ आले. तुला पोटभर जेवण देतो, असे सांगून ते तिला घेऊन गेले.
तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत तिचे हातपाय बांधून तोंडात बोळा कोंबून तिच्यावर पाच जणांनी अत्याचार केला.अनेक दिवस ही तरुणीची शुद्ध हरपली होती.
दरम्यानच्या काळात ती गरोदर असल्याचे रुग्णालय व्यवस्थापनाच्या निदर्शनात आले. ती शुद्धीवर आल्यानंतर अनाथालयाच्या मदतीने पोलिसांनी पाच अनोळखी आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.