राजेंद्रकुमार शेळके
शिक्रापूर, (पुणे) : रांजणगाव एमआयडीसी परिसरात गावठी बनावटीचे पिस्तूल विक्री करण्यासाठी आलेल्या आरोपीला रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
आकाश हरिदास पाटील (वय- २३, रा. रांजणगाव ता. शिरूर) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रांजणगाव एमआयडीसी पोलीसांचे पथक गस्त घालीत असताना पोलीस निरीक्षक महेश ढवान यांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, आकाश पाटील हा बनावटीचे पिस्तूल घेऊन विक्री करण्यासाठी येणार आहे. मिळालेल्या माहितीच्या अनुशंघाने पोलीस पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
दरम्यान, त्याच्या अंगाची झडती घेतली असता पँटमध्ये ३५ हजार १०० रुपयांचे गावठी बनावटीचे पिस्तूल मिळून आले. याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक महेश ढवान यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल विजय शिंदे, पोलीस हवालदार विजय सरजीने, संतोष औटी यांनी केली आहे.