राहुल कुमार अवचट
यवत, (पुणे) : पुणे – सोलापूर महामार्गाच्या बाजूला फोनवर बोलत असलेल्या एका तरुणाला मोटारसायकलवर आलेल्या तिघांनी चाकूचा धाक दाखवून नंबर नसलेल्या नव्या कोऱ्या दुचाकीसह पंधरा हजार रुपयांची रोख रोकड पळवून नेल्याची घटना घडली आहे. (Yavat News)
बोरीपार्धी (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीतील चौफुला येथे गुरुवारी (ता. ०८) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.(Yavat News)
याप्रकरणी अभिषेक सुर्यकांत कांबळे (वय -२१ रा. बौध्दवस्ती लोणी काळभोर, ता. हवेली) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार यवत पोलिसांनी अज्ञात तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.(Yavat News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक कांबळे हे त्यांची दुचाकी घेऊन पुणे – सोलापूर महामार्गावरून सोलापूरच्या बाजुने निघाले होते. यावेळी त्यांना फन आल्याने त्यांनी त्यांची गाडी बोरीपार्धी चौफुला येथील महामार्गावर असलेल्या उड्डाणपुलाच्या खाली उभी केली. व गाडी थांबवून फोनवर बोलत होते. यावेळी गाडीच्या जवळ असल्याने त्यांनी गाडीची चावी हि गाडीलाच ठेवली होती.(Yavat News)
यावेळी अचानक समोरच्या बाजूने तिघेजण एका दुचाकीवरती आले व त्यांनी कोणतीही विचारपूस तसेच काही न म्हणताच लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी चाकुचा धाक दाखवून ९२ हजार रुपये किंमतीची आरटीओ पासिंग न झालेली ९२ हजार रुपयांची नवी कोरी दुचाकी व १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन असा १ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल पळवून घेऊन गेले. गेल्याची तक्रार यवत पोलीस ठाण्यात दिली आहे. (Yavat News)
दरम्यान, पुढील तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे हे करीत आहेत.(Yavat News)