नागपूर : एका महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करून पुन्हा तिच्या मृतदेहावर आरोपींनी बलात्कार केल्याची लाजिरवाणी घटना नागपूरच्या खापा तालुक्यात घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला शेतात कापूस वेचण्यासाठी गेली होती. यावेळी पीडित महिला शेतात एकटी असल्याचे पाहून आरोपी तिच्याकडे आले. त्यानंतर त्यांनी या महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. मात्र या महिलेने विरोध करताच आरोपींनी तिला जबर मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
त्यानंतर आरोपी नराधम एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी या महिलेची धारधार कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. यानंतर आरोपींनी महिलेच्या मृतदेहावर सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणातील खापा पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे.