दौंड : दौंड तालुक्याच्या पारगाव हद्दीत असणाऱ्या भीमा नदीपात्रात सहा दिवसांपूर्वी चार जणांचे मृतदेह आढळून आले होते. त्यांची ओळख पटलेली असून ते अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यातील आहेत. ते एखाद्या छोट्या वहानाने प्रवास करत असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
मोहन उत्तम पवार (वय ४८) , संगिता मोहन पवार (वय ४५), राणी शाम फुलवरे (वय २५), शाम फुलवरे (वय २८, (सर्व रा . निघोज ता . पारनेर जि . नगर)) अशी सापडलेल्या मृतांची नावे असुन त्यांच्या सोबत चार वर्षांखालील ३ लहान मुले होते. हे माती वडार समाजातील भटकंती करणारे हे कुटुंब आहे.
मंगळवारी (दि. १७) हे सर्व लोक सकाळी आकाराच्या सुमार छोट्या वाहनाने प्रवासासाठी निघाले होते. पाल ठोकून राहण्यासाठीचे साहित्य घेऊन ते पारनेर तालुक्यातील निघोज या गावातून निघाले, अशी माहिती पारनेर पोलिसांनी दिली आहे.
शिरूर चौफुला रोडवर असलेल्या दौंड तालुक्यातील पारगाव हद्दीत भीमा नदीच्या पात्रात एकाच कुटुंबातील चार जणांचे मृत्यदेह आढळून आले होते. या मृतदेहांमध्ये दोन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. १८ जानेवारी रोजी एका महिलेचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर २०, २१ व २२ जानेवारी रोजी तीन मृतदेह टप्पा टप्प्याने आढळून आले होते.
भीमा नदीच्या पात्रात मागील पाच दिवसात एकाच कुटुंबातील चार मृतदेह आढळून आल्याने यवत पोलीस सतर्क झाले आहेत. मात्र, त्यांच्या सोबत असलेल्या तीन लहान मुलांचा अद्याप ही शोध लागला नाही.
दरम्यान, ही आत्महत्या आहे की अपघात आहे की घातपात, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. मात्र सोमवारी ( दि २३ ) पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी या घटनेबाबत माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली आणि प्रत्यक्ष पाहणी केली.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामीण पोलीस अधीक्षक गोयल यांनी स्थानिक ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभाग व यवत पोलीस यांची पथके शोध मोहीम साठी तैनात केली आहेत.
या घटनेबाबत यवत पोलीस सखोल तपास करीत आहेत. दरम्यान, पारनेर तालुक्यातील या कुटुंबातील व्यक्तींना पिकअप, छोटा हत्ती किंवा इतर वाहनाने त्यांना प्रवास करण्यासाठी घेतले होते का ? लिप्ट दिली होती काय ? त्यांना कोणी पाहीले होते काय ? किंवा याबाबत काही माहीती असल्यास यवत व पारनेर पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे
काही माहिती मिळाल्यास पुढील नंबरवर संपर्क साधावा असे, आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
यवत पोलीस निरीक्षक : ९९२३६००००१७, यवत पोलीस उपनिरीक्षक ९४०४९६९००५,
पोलीस निरीक्षक पारनेर- ९५५२५३०५२७ , पोलीस उपनिरीक्षक पारनेर- ९९२२९३२२३०