उरुळी कांचन : चिप्स देण्याच्या बहाण्याने उरुळी कांचन (ता. हवेली) येथील तीन वर्षाच्या चिमुकल्याचे पुणे रेल्वे स्थानकावरून अपहरण झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी (ता.१०) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. या प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुपेश भुवन पाटले (वय -२ वर्ष ११ महिने) असे अपहरण झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याची आई पार्वती भुवन पाटले (वय- २२ , व्यवसाय – मजुरी रा.उमराव सिटी, भगारे वस्ती, उरुळी कांचन, मूळ रा. हाऊस नं. 52,02, ग्राम मेडपार बजार, पो.सागर ता.तखतपुर जि.बिलासपूर राज्य. छत्तीसगढ) यांनी पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार एक महिला व पुरुषाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पार्वती पाटले या उरुळी कांचन परिसरात मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. पार्वती पाटले या कुटुंबासोबत त्यांच्या मूळ गावी बिलासपूरला शनिवारी चालल्या होत्या.
पुणे रेल्वे स्टेशन येथे आल्यानंतर अनोळखी स्त्री (वय अंदाजे ४० वर्षे व अनोळखी पुरुष वय अंदाजे 35 वर्षे) यांनी भुपेशला चिप्स खायला द्यायच्या आमिषाने पळून नेले आहे.