मुंबई : मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका दहा वर्षांच्या मुलावर तीन अल्पवयीन मुलांनी लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना बुधवारी समोर आली. पीडित मुलाला खुर्चीवर बसण्यात अडचण येत होती, त्यावेळी शेजारच्या महिलेच्या लक्षात आले. त्या महिलेने मुलाच्या पालकांना याबद्दल सांगितले. तेव्हा पालकांनी मुलाला याबाबत विचारले असता त्याने ही भयानक गोष्ट सांगितले. याबबत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
घाबरलेल्या आणि संतप्त झालेल्या पालकांनी पंत नगर पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि त्यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश केवले यांना सर्व घटना सांगितली. मुलाच्या म्हणण्यानुसार,
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, फिर्यादींचा मुलगा आणि ती तीन मुले शेजारीच राहतात, त्यांनी पीडित मुलाला त्यांच्या घरी आणले, मुलांनी पहिल्यांदा मुलाचे कपडे उतरवले, आणि नंतर त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले. याबाबत पीडित मुलाच्या पालकांच्या लक्षात आले की, त्यांच्या मुलाच्या वागणुकीत बदल झाला आहे, तो एकटा एकटा राहायचा, त्याचे जेवन कमी केले होते आणि त्याने घरच्यांशी बोलणेही कमी केले होते.
मात्र, पालकांनी असे गृहीत धरले की हे शैक्षणिक तणावामुळे झाले असेल. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पीडितेचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. याप्रकरणी 12, 15 आणि 16 वर्षे वयोगटातील तीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.