लोणीकंद : लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत निर्माण करुन सामान्य नागरीकांना वारंवार त्रास देणाऱ्या व नुकताच मोक्कातून जामिनावर बाहेर आलेल्या वाघोली (ता. हवेली) येथील अट्टल गुन्हेगाराला लोणीकंद पोलिसांनी २ वर्षासाठी जिल्ह्यातुन तडीपार केले आहे.
गणेश रामदास काळे (वय-३२, रा. वाघेश्वर नगर गोरेवस्ती रोड, वाघोली, ता. हवेली) अशी तडीपार करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाघोली, लोहगाव व परिसरातील भागात दहशत निर्माण करत सामान्य नागरीकांना वारंवार कुरघोडी करत लुटमार व गंभीर दुखापत करणाऱ्या करत असे. यापूर्वी गणेश काळेने घातक शस्त्र वापरुन दहशत निर्माण करणाऱ्या या सराईत गुन्हेगारांच्या कृत्यामुळे लोकांच्या मनातुन कायद्याविषयी संभ्रम निर्माण झाला होता.
सदर सराईत गुन्हेगारावर कायद्याचा वचक बसावा या उद्देशाने सदर इसमावर सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव, पोलीस निरीक्षक गजानन पवार, गुन्हे शाखेचे मारुती पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस नाईक प्रशांत कापुरे, सागर कडु यांनी सदर सराईत टोळीप्रमुख व त्याच्या साथीदारांवर गुन्ह्याचा अभिलेख तपासून महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ प्रमाणे तडीपार करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस उपआयुक्त रोहिदास पवार यांच्याकडे पाठविला होता.
पोलीस उपआयुक्त रोहिदास पवार यांनी सदर प्रस्ताव मंजूर करून आरोपीला पुणे जिल्ह्याच्या हद्दीतुन दोन वर्षाकरीता तडीपार केले आहे.
सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपआयुक्त रोहिदास पवार, सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव, लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत टेमगिरे, रामकृष्ण दळवी, पोलीस नाईक प्रशांत कापुरे, सागर कडु यांनी केली आहे.