चाकण : ट्रॅक्टरच्या ट्रॉली खाली चिरडून सहा महिन्याच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना राजगुरुनगर (ता. खेड) येथे नुकतीच उघडकीस आली आहे. या अपघाताचा व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आई-वडिल सहा महिन्याच्या बाळाला घेऊन दवाखान्यात दुचाकीवरून चालले होते. तेव्हा वाटेत दुचाकीला ट्रक्टरने हलकी धडक दिली. यात बाळाचे आई वडील आणि बाळ हे तिघेही गाडीवरुन खाली पडले. मात्र ट्रॅक्टरचे पाठीमागील चाक बाळाच्या अंगावरून गेले. आणि या अपघातात बाळाचा जागीच मृत्यू झाला. तर मृत बाळाला कडेवर घेऊन आईने भर रस्त्यावरच हंबरडा फोडला आहे.
दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने नेटक-यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ३ मुलींमुळे हा अपघात झाला, टू- व्हीलर ट्रॅक्टरला ओव्हरटेक करू शकली नाही, तर काही जणांनी सांगितले की ट्रॅक्टर पण वेगात होता. तरी, पुढील तपास पोलीस करीत आहेत