पुणे : पुण्यात चायनीज मांजा विक्री करणाऱ्याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक पाचच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून ८ हजार रुपये किमतीचे १५ नायलॉन मांजाचे रिल जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान करण्यात आली आहे.
अब्दुल रहेमान पापा शेख (वय-६५ रा. आश्रफनगर, कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, नायलॉन मांजा विक्रेत्यांचा शोध घेत असताना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने एका दुकानावर छापा टाकून मांजाचे रिल जप्त केले आहेत. तसेच दुकानदाराला अटक केली आहे. ही कारवाई कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान करण्यात आली.
ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार , सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक , अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे , सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-2 नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उल्हास कदम , पोलीस उप निरिक्षक अविनाश लोहोटे, पोलीस अंमलदार रमेश साबळे, दया शेगर, आश्रुबा मोराळे, शहाजी काळे, पृथ्वीराज पांडुळे यांच्या पथकाने केली आहे.