Pune Crime News : पुणे : ज्येष्ठ नागरिकाला सेक्स टॉर्शनच्या (Sex Torsion Threatened) जाळ्यात ओढून न्यूड व्हिडीओ (nude video viral) व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल पावणे पाच लाखांची खंडणी (Extortion) उकळल्याची घटना पुण्यात घडली आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा (Chatusringi Police Station) दाखल करण्यात आला आहे. Pune Crime News
अज्ञाताविरुद्ध चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..!
याप्रकरणी एका ६४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानूसार, अज्ञात मोबाईल धारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २१ ते २३ मार्च या कालावधीत हा प्रकार घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदारांना तरुणीच्या नावाने संपर्क साधण्यात आला होता. या तरुणीने त्यांच्याशी चॅटिंग केले व व्हिडीओ कॉल देखील केला. पण, त्यांना एक नग्न व्हिडीओ दाखवत त्यांनाही नग्न होण्यास भाग पाडले. न्यूड व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे उकळले आहे. त्यांना प्रथम न्यूड व्हिडीओ कॉल करण्यास भाग पाडले होते.
दरम्यान, त्यानंतर त्यांना यातील काही आरोपींनी आम्ही पोलीस असून, युट्यूबवरून हा व्हिडीओ डिलीट करण्यासाठी चार्जेस म्हणून देखील पैसे उकळले. आरोपींनी ज्येष्ठ नागरिकाकडून ४ लाख ६६ हजार रुपये उकळले आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.