दीपक खिलारे
इंदापूर : इंदापूर येथे ट्रॅक्टर व दुचाकीच्या झालेल्या अपघातात इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. हि दुर्देवी घटना शहरातील महाविद्यालयासमोर शनिवारी (दि.१०) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.
सानिका राजेंद्र लिके (वय १६ वर्षे) हिचा या अपघातात दुर्देवी मृत्यू झाला. अपघातात मृत्यू पावलेली विद्यार्थ्यांनी हि इंदापूर येथील माऊली बाल आश्रमात गेल्या आठ वर्षांपासून राहत होती. ती शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या विद्यालयात इयत्ता दहावीमध्ये शिकत होती.
याबाबत सविस्तर हकीकत अशी की, सानिका लिके ही विद्यार्थिनी आपल्या इलेक्ट्रीक दुचाकीवरुन जात असताना शहरातून भरधाव वेगाने जात असलेल्या उसाच्या मोकळ्या ट्रॅक्टरखाली सापडली. यात तिचा जागेवरच मृत्यू झाला.
या घटनेनंतर शहरातील नागरिकांनी आक्रमक होऊन रस्त्यावरील वाहतूक काही काळाकरीता रोखून धरली होती.