खेड-शिवापूर : पुणे- सातारा महामार्गावरील शिवापूर (ता. हवेली) येथील ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकून ८ तोळे सोने लुटल्याची घटना बुधवारी (ता.२४) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. सोने लुटून जाताना दरोडेखोरांचा हवेत गोळीबार करून दुचाकीवरून पसार झाले आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
याप्रकरणी धुकसिंग वागसिंग राजपुत (वय ५२, रा. शिवापुर नवकार पार्क ए विंग फ्लॅट नं. ३०३ ता. हवेली जि. पुणे. मुळ रा. मडीया ता/जि.सिरोही राज्य राजस्थान) यांनी राजगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार चार दरोडेखोरांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-सातारा महामार्गावरील खेड शिवापूर या गावातील शिवापूर वाडा येथील श्री गणेश ज्वेलर्स या दुकानावर चार अज्ञात तरुण आले. दुकानात येवुन एकाने मला हिंदीमध्ये इधरसे हिलने का नही असा दम दिला. त्याने त्याचे हातामधील पिस्टल माझेवर रोखुन धरला.
तर त्याच्या दुसऱ्या साथिदाराने हातामधील कोयत्याने दुकानातील कांउटरच्या काचा फोडुन नासधुस केली. त्यावेळी त्यांच्यातील तिस-या साथिदाराने कांउटरच्या पाठीमागे असलेल्या लाकडी कपाटावर ठेवलेले ८ तोळे वजनाचे सुमारे ४ लाख सोन्याच्या दागिन्याची जबरी चोरी केली. आणि जाता-जाता त्यांनी हवेत गोळीबार केला आणि दोन दुचाकीवरून ते पुण्याच्या दिशेने पसार झाले.
या घटनेची माहिती मिळताच राजगड पोलिस ठाण्याचे राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील आणि सहायक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पाटील यांनी सूत्रे हलवून दरोडेखोरांच्या शोधार्थ ठिकठिकाणी पथके रवाना केली आहेत.
दरोडेखोरांच्या शोधासाठी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. दरोडेखोरांना लवकर पकडण्यात येईल. असे पाटील यांनी सांगितले आहे. तरी, पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नवसरे करीत आहेत.