नाशिक : मुंबई येथून शिर्डीकडे जाणाऱ्या खाजगी आराम बस व मालवाहू ट्रकची समोरासमोर धडक होऊन १० जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर १७ पेक्षा जास्तजन गंभीर जखमी झाले आहेत. हि घटना पाथरे शिवारात ईशानेश्वर मंदिराच्या कमानीजवळ पहाटे हा अपघात झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर येथून १५ बस साई दर्शनासाठी निघालेल्या होत्या. पाथरे ते पिंपळवाडी येथील टोलनाके दरम्यान एकेरी वाहतूक सुरू होती. अंबरनाथ ठाणे परिसरातील सुमारे ५० प्रवासी या बसमधून शिर्डीकडे प्रवास करत होते.
मुंबई येथून शिर्डी महामार्गावर पाथरे शिवारात ईशानेश्वर मंदिराच्या कमानीजवळ भीषण अपघात झाला आहे. खाजगी आराम बस व ट्रकची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झाला.
बस चहा पाण्यासाठी थांबल्यावर बस बदलून बसले होते. त्यामुळे मृतांची नावे व बसमधील प्रवाशांची नावे कळण्यास उशीर लागेल. गाईड ट्रॅव्हल्स या कंपनीची बस होती. ३५ ते ४० प्रवासी उपचाराकरिता सिन्नर येथील खाजगी रुग्णालयात पाठवण्यात आले त्यात मृतांचा देखील समावेश आहे.
या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपये मदत देण्याची, तसेच जखमींचा उपचार शासकीय खर्चातून करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी दिले आहेत. गरजूंना सर्व प्रकारची मदत स्थानिक प्रशासन करीत असून या अपघाताच्या चौकशीचे आदेश सुद्धा देण्यात आले आहेत.
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) January 13, 2023
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून या अपघाताबाबत जाहीर दुख व्यक्त केले असून मृतांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे.