पुणे : शेजारच्याशी भांडणे व शिवीगाळ करणार्यास समजावून सांगत असताना वकिलाने सहायक पोलीस निरीक्षकाच्या अंगावर धावून जाऊन चावीने मारहाण करुन जखमी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकणी मार्केटयार्ड पोलिसांनी वकील आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
प्रतीक अंकुश तावरे (वय ३५, रा. पायगुने बंगला, धनुर्धारी सोसायटी, मार्केटयार्ड) या अटक करण्यात आलेल्या वकिलाचे नाव आहे. तर, सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, मार्केटयार्ड येथील बुराणी कॉलनीत भांडणे सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तेव्हा सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे हे रात्री तेथे गेले. तेव्हा प्रतीक तावरे हे त्याच्या घराशेजारी राहणारे हर्षल लाहोटे यांना अर्वाच्या भाषेत शिवीगाळ करीत होते.
दरम्यान, सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे त्यांना समजावून सांगून शांत करीत असताना तो मी वकील आहे, असे म्हणून अश्लिल शिवीगाळ करुन पोलीस अधिकार्यांना हाताने बाजूला ढकलले. तसेच त्यांच्या अंगावर जाऊन हल्ला केला.
हातातील चावीच्या टोकाने फिर्यादी यांच्या तोंडावर मारुन डाव्या डोळ्याजवळ व पापणीवर दुखापत केली. याप्रकणी मार्केटयार्ड पोलिसांनी वकील आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.