पुणे : मध्यप्रदेशातील एका खाजगी रुग्णालयाला लागलेल्या आगीत १० जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. मध्यप्रदेशातील शिवनगर परिसरात असलेल्या न्यू लाईफ मल्टी स्पेशलिटी या खाजगी रुग्णालयात आगीची ही भीषण दुर्घटना घडली आहे.
तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. या रुग्णालयामध्ये आपत्कालीन स्थितीत बाहेर पडण्यासाठी पर्यायी मार्ग नसल्यामुळे अनेक जण रुग्णालयात अडकले असून त्या ठिकानी बचाव कार्य सुरू आहे.
विविध आजारांवर येथे उपचार केले जातात. यामुळे अनेक रुग्ण येथे उपचारासाठी येत असतात. आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. आग लागताच हॉस्पीटलमधील स्टाफने आग विजवण्याचा प्रयत्न केला. मात्र आग आणखीणच भडकली. कर्मचाऱ्यांनी सतर्कता दाखवत तात्काळ रुग्णालयातील वीज पुरवठा बंद केला. यामुळे मोठी हानी टळली.
रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या या भीषण दुर्घटनेत दहा जणांचा मृत्यू झाला आहे. मृत व्यक्ती रुग्ण होतो की कोण होते. या बााबत अद्याप काहीच माहिती मिळू शकलेली नाही. ही दुर्घटना अत्यंत भीषण होती यामुळे यात अनेक जण जखमी झाल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. या आगीत हॉस्पीटलचे प्रचंड नुकसान झाले आहे.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. त्यांनी या दुर्घटनेनंतर एक ट्वीट करत तातडीने मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. आपण सातत्त्याने रुग्णालय प्रशानाच्या संपर्कात असून जखमींना वेळेवर उपचार मिळावेत तसेच सर्व मदत मिळावी यासाठी प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्वीटमध्ये म्हंटले आहे. मुख्य सचिवांना परिस्थिती नियंत्रणात येई पर्यंत लक्ष ठेवण्याचे आदेश दिल्याचेही चौहान यांनी सांगीतले.