लोणी काळभोर, (पुणे) : लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत ६ किलो गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला अंमली पदार्थ विरोधी पथक २ च्या गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून एक मोटारसायकल व गांजा असा १ लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. हि घटना बुधवारी (ता. ३१) आकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
सुरेश रामदास पवार (वय-३९, रा. कुंजीरवाडी, ता. हवेली, मूळ रा. आसू, ता. परंडा, जि. उस्मानाबाद) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी योगेश नामदेव मांढरे (वय-३५, पोलीस शिपाई, अंमली पदार्थ विरोधी पथक २ पुणे,शहर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील रामदरा मंदिराकडे जाणऱ्या रोडचे कडेला असलेल्या वजन काटा परिसरात सुरेश पवार हा दुचाकीसह बेकायदेशीर गांजा विक्रीकरिता बाळगून असताना मिळून आला. त्याच्याकडून १ लाख २३ हजार रुपयांचा गांजा व २० हजार रुपयांची दुचाकी असा १ लाख ४३ हजार रुपयांचा गांजा जप्त केला आहे.
दरम्यान, बेकायदेशीररीत्या गांजा जवळ बाळगून मिळून आल्याने आरोपीच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे करीत आहेत.