पुणे : विवाहित प्रियकरासोबतच्या नात्यात अडथळा ठरत असलेल्या प्रियकराच्या पत्नीचा एका महिलेने गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक राजगुरुनगर मध्ये घडली असून या प्रकरणी राजगुरूनगर पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे.
स्वाती रेंगडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपी प्रेयसीचे नाव आहे. कोमल थिंगळे-केदारी असे हत्या करण्यात आलेल्या प्रियकराच्या पत्नीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, विवाहित प्रियकरासोबतच्या नात्यात त्याची पत्नी अडथळा ठरत असल्यामुळे आरोपी प्रेयसीने तिच्या घरी जाऊन गुरुवारी (ता. १७) गळा दाबून हत्या केली. त्यानंतर ही आत्महत्या असल्याचे भासवण्याचा प्रयत्नही केला गेला.
दरम्यान राजगुरुनगर पोलिसांच्या सतर्कतेमुळे आत्महत्येचा बनाव फसला आणि याप्रकरणी आरोपी प्रेयसीला अटक करण्यात आली. आरोपी महिलेने या हत्येची कबुली दिली आहे.
या घटनेचा पुढील तपास राजगुरुनगर पोलीस करीत आहे.