Junnar News : नारायणगाव (पुणे) : पुणे-नाशिक महामार्गावर ( Pune-Nashik highway) नारायणगाव ग्रामपंचायत हद्दीत ( Narayangaon Gram Panchayat limits) एक बिबट्या मृतावस्थेत ( leopard has been found dead) आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. गुरुवारी (ता. ०४) हा अपघात नारायणगाव येथील मुक्ताई ढाब्याजवळ मिना शाखा कालव्यालगत ( Mina branch canal) पहाटे पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास झाला आहे. (Junnar News)
सहा ते सात बिबट्यासह वन्यप्राणी ठार
बिबट प्रवण क्षेत्र म्हणून परिचित असलेल्या जुन्नर तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगाव परिसरात गेल्या चार वर्षात सुमारे सहा ते सात बिबट्यासह वन्यप्राणी अज्ञात वाहनांच्या धडकेत मृत्युमुखी पडले आहेत.
गुरुवारी पहाटे झालेल्या या घटनेची खबर नारायणगाव पोलीस स्टेशनला मिळताच पोलीस नाईक आदिनाथ लोखंडे, वनरक्षक रामेश्वर फुलवाड, पोलीस पाटील सुशांत भुजबळ, रेस्क्यू टीम सदस्य किरण वाजगे तसेच स्थानिक नागरिक दिलीप पाटे, नंदू अडसरे, अंबादास वाजगे, चिराग कोराळे यांनी महामार्गावर मध्यभागी मृतावस्थेत पडलेल्या बिबट्याला उचलून रस्त्याच्या कडेला ठेवले.
दरम्यान, माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रातील कर्मचारी व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मृत बिबट्याला माणिकडोह येथे शवविच्छेदनासाठी नेले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा..
Jejuri News : नाझरे जलाशयाच्या परिसरात बिबट्याचा वावर ; बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी..!