पुणे – ज्येष्ठ महिलेला २ कोटीचे आमिष दाखवून सायबर चोरट्याने तब्बल ५८ लाखाला गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरात नुकताच उघडकीस आला आहे.
याप्रकरणी ज्येष्ठ महिलेनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार सायबर पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेष्ठ महिला आणि सायबर चोरटा यांची सोशल मिडीयावर ओळख झाली. या ओळखीचा फायदा घेऊन सायबर चोरट्याने महिलेच्या मोबाईलवर संपर्क केला. आणि परदेशातून २ कोटी रुपये भेट म्हणून पाठविणार आहे. असे जेष्ठ महिलेला आमिष दाखविणे.
त्यानंतर, ज्येष्ठ महिलेच्या मोबाइल क्रमांकावर आशा कुमारी नावाच्या महिलेने संपर्क किला. आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियातून बोलत आहे असे सागितले, तसेच रिझर्व्ह बँकेशी साधर्म्य असलेला ईमेल महिलेला पाठविला. व ज्येष्ठ महिलेने वेळोवेळी पैशे पाठविण्यास सांगितले. त्यानुसार महिलेने ५७ लाख ७९ हजार ३०० रुपये पाठविले. परंतु, तिला दोन कोटी रुपयांची रक्कम मिळाली नाही.
दरम्यान, महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने तत्काळ सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार सायबर पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तरी, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे करीत आहेत.