खंडाळा : पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटामध्ये आज रविवार (ता.८) दुपारी एक वाजता मालट्रकचा ब्रेकफेल झाल्याने घाटात एम .जी हेक्टर या महागडया गाड्या घेऊन जात असलेल्या कंटनेरला मालट्रकने धडक दिल्याने डिझेल टाकी फुटुन कंटेनरने तत्काळ पेट घेतला.
यामध्ये एकुण सहा एमजी हेक्टर गाड्या व कपडयाचे रोल तसेच दोन मालगाड्या असे मिळुन अंदाजे दोन ते तीन कोटी रुपयाचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यामध्ये कसलीही जीवित हानी झाली नाही.
दरम्यान पोलीस निरीक्षक महेश इंगळे, दत्तात्रय गुरव व प्रकाश घनवट यांनी घटना स्थळी तात्काळ अग्निशामक बंब बोलावुन आग आटोक्यात आणण्यात आली.
याबाबत मिळलेली माहिती अशी की कंटेनर गाडी क्रमांक एन १ ०१ ए बी १२०८ हे एमजी हेक्टर या सहा महागडया गाड्या घेऊन गुजरात मुंबईवरून हुबळी कर्नाटक येथे जात होता, तर हरियाना गुडगाववरून कपड्याचे बंडल घेऊन बंगलोरच्या दिशेने मालट्रक जी जे २७ एक्स ६१९९ हा निघाला होता. मालट्रकचा ब्रेकफेल झाल्याने अपघात घडला.