कर्जत : कर्जत पोलिसांचा अवैध धंद्यावरील कारवाईचा धूमधडाका सुरूच ठेवला आहे. पोलिसांनी एका महिन्यात तब्बल ५ दारू विक्रेत्यांवर गुन्हा दाखल केला आहे. तर लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करून इतर मुद्देमाल नष्ट केला आहे, अशी माहिती कर्जर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली. मात्र या कारवाईमुळे दारूविक्रेत्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
रक्कम गोरख तांदळे (जलालपूर) ,सुरज तात्या काळे(नांदगाव),पूजा बिपिन पवार, नारायण किसन जांभळे,लंकेश चिवल्या काळे (राशिन), सतीश तुकाराम विरकर (बारडगाव), कोंडीबा दत्तू पावणे (पावणे वस्ती), महेश गंडीशा काळे (धालवडी), बसंती सचिन भोसले (चिलवडी), देविदास कुंडलिक भिवंडी (गायकरवाडी), जालिंदर रामा पवार (अत्तारवाडा), मंगल देविदास आगलावे (चिलवडी),गोरख पोपट भवाळ (धालवडी) कंदर शहाबुद्दीन शेख (पाटेवाडी), धनाजी शिवाजी जायभाय (दुरगाव), श्रीकांत बंडू भोसले (निमगाव डाकू), धुराजी खानवटे (खानवटेवस्ती), छापाबाई बाबासाहेब काळे (सिद्धटेक),शिवबाई पांडुरंग भाले, आदेश भारत गजरमल, अक्षय विजय भवाळ,नाना मच्छिंद्र सुपेकर,जयश्री मोहन चव्हाण (सर्व कुळधरण), संतोष केशवराव देशमुख (कराड), छली लोण्या काळे (झारेकर गल्ली), रेवन्नाथ आबा दिंडोरे (राक्षसवाडी), नानासाहेब दत्तात्रय राक्षे (बेलवंडी), ईश्वरसिंग नारायणसिंग परदेशी (रजपुतवाडी), कयामत कुंडलिक काळे (दुधोडी), मुकुंद बाळासाहेब टकले (आळसुंदे), सुभाष भीमराव कटारे, सुभाष भीमराव कटारे(दोघेही लोणी मसदपूर), कपिलकुमार श्यामलाल कनोजिया, सुनील चव्हाण राहणार (खंडोबाचा मळा), प्रवीण कानिफनाथ काळे,अभिषेक रोमन काळे (दोघेही भांडेवाडी) अशा एकूण ३५ दारूविक्रेत्यांवर कर्जत पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकले. पोलिसांनी यापूर्वीच्या महिन्यात पंधरा दिवसात १७ दारू विक्रेत्यांवर कर्जत पोलिसांकडून कारवाई करण्यात आली होती. या कारवाईमुळे दारूविक्रेत्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. सध्या तालुक्यातील अनेक अवैध व्यवसाय व अवैध धंदे मोडीत काढण्यासाठी कर्जत पोलिसांनी कंबर कसली आहे. कुळधरण तसेच राशीन परिसरात मोठ्या प्रमाणावर कारवाया केल्या असून यापुढेही कारवाईचे सत्र सुरूच राहणार आहे.
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव म्हणाले कि, कर्जत तालुक्यातील काही ठिकाणी सुरू असलेल्या अवैध दारू धंद्यांचे उच्चाटन करण्यासाठी कर्जत पोलीस सरसावत असताना, गावातील तक्रारी पोलिसांना कळवाव्यात तसेच माहिती व तक्रारदाराचे नाव गुपित ठेवण्यात येईल. असे आवाहन यादव यांनी केले आहे.