राहुलकुमार अवचट
यवत, (पुणे) : कानगाव – मांडवगण रस्त्यावरील हॉटेल विसावाच्या पाठीमागील बाजूस देशी दारू विक्री करणाऱ्या कानगाव (ता. दौंड) येथील एकावर यवत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
संजय दत्तात्रय फडके (वय- वय-३७ वर्षे, रा. कानगाव, ता.दौंड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई दत्तात्रय टकले यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कानगाव, ता. दौंड, जि.पुणे गावच्या हद्दीत कानगाव – मांडवगण रस्त्यावरील हॉटेल विसावाच्या पाठीमागे संजय फडके हा देशी दारूच्या बाटल्या विकत असल्याची माहिती यवत पोलिसांना मिळाली होती.
सदर ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला असता आरोपी संजय फडके हा देशी दारू टँगोच्या बाटल्या एका पिशवीतून विक्री करत असल्याचा आढळून आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार कदम हे करीत आहेत.