अतुल जगताप
वडूज : खटाव तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या आपले सरकार सेवा केंद्रातील रोख रक्कम बनावट खात्यात जमा करून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी संगणक परिचालक रियाज पटेल,तालुका व्यवस्थापक विशाल सुर्यवंशी, खंडाळा येथील विनोद साळुंखे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत खटावचे गट विकास अधिकारी उदयसिंह साळुंखे यांनी फिर्याद दिली आहे. सदर आरोपी फरार असून आणखी काही आरोपींना अटक होऊ शकते अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.आरोपींच्या मार्गावर पोलीस असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
याबाबत माहिती अशी की, शासन निर्णयातील मार्गदर्शक सुचनानुसार दि ११ ऑगस्ट २०१६ रोजीच्या आदेशानुसार खटाव तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये किंवा गटामध्ये आपले सरकार सेवा केंद्र उभारणी करणेतआले आहे. त्याचेवर नियंत्रण काम पाहणेकरीता पंचायत समिती येथे तालुका स्तरिय आपले सरकार सेवा केंद्र असून खटाव पंचायत समिती येथे त्याचे तालुका व्यवस्थापक विशाल उत्तम सुर्यवंशी, व संगणक परिचालक रियाज जलालुद्दीन पटेल असे दोघे काम पाहत होते.
सन २०२०-२१ ते आजपर्यंत खटाव तालुक्यातील ग्रामपंचायत व गटामधील आपले सरकार सेवा केंद्राचे चालक हे पंचायत समिती वडूज येथे येवून वारंवार त्यांचे खात्यावर आपले सरकार दाखल्याचा मोबदला जमा होत नसलेबाबतच्या समक्ष तक्रारी करु लागले त्यावेळी दिनांक २०ऑगस्ट २२ रोजी जिल्हास्तरावर अति मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प सातारा यांचे अध्यक्षतेखाली मिटींग झाली. त्यावेळी तालुका स्तरीय चौकशी समिती गठीत करुन अहवाल सादर करणेबाबत आदेशित करणेत आले होते. त्यावरुन तालुका स्तरीय चौकशी समिती नेमणेत आली. त्याचेअध्यक्ष म्हणून श्री साळुंखे काम पहात होते.
आपले सरकार केंद्राची तपासणी करताखटाव तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या आपले सरकार सेवा केंद्रासाठी दयावयाचा मोबदला/रकमा शासकिय खाते व्यक्तिरिक्त इतर (अनाधिकृत)खात्यावर वर्ग झाल्याचे दिसून आले. त्यामध्ये खटाव तालुक्यात आपले सरकार सेवा केंद्र या नावाचे आय डी बी आय बँकेच्या खात्यावर वर्ग झाल्याचे दिसून आले. त्यामध्ये खटाव तालुक्यात रियाज जलालुद्दीन पटेल याचे कादगपत्र जोडून अनधिकृत खाते उघडल्याचे प्रथमदर्शी निर्दशनास आल आहे.
सदरचे खाते दि १६ सप्टेंबर १९ पासून खाते बकेने सुरू केले आहे रियाज जलालुद्दीन पटेल हे आपले सरकार सेवा केंद्र पंचायत समिती खटाव येथे आपले सरकार सेवा केंद्र संगणक परिचालक (सध्या सेवेतून कमी) हे या अपहार प्रकरणात प्रथमदर्शनी दोषी आढळून आले.४२ लाख ३७ हजार १७७रुपये व ७लाख ९४ हजार रुपये श्री विशाल उत्तम सुर्यवंशी यांना वर्ग झाले आहेत तसेच विनोद भानुदास साळुंखे रा खंडाळा याचे आय डी बी आयशाखा वाठार येथे २लाख ८० हजार ६३७ रुपये जमा करणेत आले आहेत.
यावरून रियाज ‘जलालुद्दीन पटेल व विशाल उत्तम सुर्यवंशी व विनोद भानुदास साळुंखे रा खंडाळा यांनी संगनमत करुन आपले सरकार सेवा केंद्र मोबदला या नावाने जिल्हास्तरावर आयडीबीआय बक प्रतापगंज पेठ शाखेत मुख्य लेखा व वित्त अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप) यांचे संयुक्त स्वाक्षरीने उघडणेत आले आहे.
हे खाते स्वतंत्र बचत खात्यामध्ये संबधित ग्रामपंचायतींना निर्धारित केलेली रक्कम भरणे आवश्यक असताना सदरची रक्कम त्या खात्यावर जमा केली असल्याचे बनावट चलन तयार करुन देवून सदर अधिकृत खात्यावर रकमा जमा न करता अपहार केलेचे दिसून आल्याची लेखी फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी भा दं वि कलम ४२०/४०९/४१८/४१९/४६५/४६७/४६८/४०६, नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस अधिकारी मालोजीराव देशमुख करीत आहेत.
दरम्यान, काही आरोपी गुन्हा दाखल होण्यापूर्वी खटाव पंचायत समितीच्या आवारात अनेकदा दिसून आले होते.तसेच संघटनेच्या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांच्या या करिष्म्याने त्यांना अटक केल्यास अनेक अज्ञात आरोपींची नावे उघड होतील अशी चर्चा सुरू झाली आहे.