शिरूर : नगर रस्त्यावरील शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हदीत कोयते उगारून समाजमाध्यमात ध्वनिचित्रफीत प्रसारित करून दहशत माजविणाऱ्या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. तर या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.
ओंकार उर्फ पांडा बाळासाहेब कुंभार (वय २३), दुर्वेश शिवाजी क्षेत्री (वय २३), दिलावर सुभान शेख (तिघे रा. शिक्रापूर, ता. शिरुर, जि. पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील ओंकार कुंभार याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नगर रस्त्यावरील शिक्रापूर परिसरात आरोपी ओंकार कुंभार, दुर्वेश क्षेत्री, दिलावर शेख यांनी समाजमाध्यमावर ध्वनिचित्रफीत प्रसारित केली होती. यामध्ये तिघांनी कोयते उगारून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. तिघे जण कोयता, तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांना मिळाली होती.
दरम्यान, पोलिसांच्या पथकाने त्वरित कारवाई केली. आरोपी ओंकार कुंभारला पकडले. त्याच्याबरोबर असलेले साथीदार दुर्वेक्ष क्षेत्री, दिलावर शेख कोयता रस्त्यावर टाकून पसार झाले. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त अधीक्षक मितेश घट्टे, उपअधीक्षक यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहायक फाैजदार जितेंद्र पानसरे, श्रीमंत होनमारे, अमोल दांडगे, मिलिंद देवरे आदींनी ही कारवाई केली.