shirur crime : पुणे: शाळा-कॉलेजातील मुला-मुलींना असभ्य आणि अश्लील वर्तन करण्यास हॉटेल आणि कॅफेमध्ये अवैध पार्टीशन करून मुभा देणार्या चालकांविरूध्द शिरूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. (A case has been filed against the cafe operators who allowed school-college boys and girls to engage in obscene movements in hotel-cafes)
तीन तीन कॅफे चालकांविरूध्द गुन्हा
अजय हनुमंत रासकर (22, रा. पिंपळनेर, ता. पारनेर, जि. अहमदनगर), विजय उत्तम गाजरे (23, रा. रामलिंग रोड, शिरूर, जि. पुणे) आणि उमेश संजय जाधव (22, रा. मार्केटयार्ड समोर शिरूर, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या हॉटेल तसेच कॅफे चालकांची नावे आहेत. (shirur crime) याबाबत शिरूर पोलिस स्टेशनमधील महिला पोलिस हवालदार यांनी फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाबुराव नगर येथील हक्झोगोन कॅफेचा चालक अजय हनुमंत रासकर, रेव्हेन्यु कॉलनी येथील युनिक कॅफेचा चालक विजय उत्तम गाजरे आणि शिरूर शहरातील टेल इलेवन कॅफेचा चालक उमेश संजय जाधव यांनी त्यांच्या कॅफेमध्ये अवैध पार्टीशन करून शाळा-कॉलेजमधील मुला-मुलींना असभ्य व अश्लील वर्तन करण्यास मुभा दिली. (shirur crime ) कॅफे आणि हॉटेलच्या बैठक व्यवस्थेत बदल केला आहे. पुढील तपास पोलिस नाईक नाथा जगताप करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Suicide | शिरुरमध्ये महिलेची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अस्पष्ट…