Pune Crime : पुणे : पुण्यातील व्यावसायिकाची (businessman) तब्बल सव्वा कोटींची फसवणूक (defrauded) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खासगी वित्तीय संस्थेची शाखा (branch of a private) सुरू करण्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाची ही फसवणूक करण्यात आली आहे. फसवणूकीच्या या घटनेनंतर व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ (A single thrill) उडाली आहे.
फसवणून झाल्याप्रकरणी लष्कर भागातील एका व्यावसायिकाने बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून याप्रकरणी याकुबअली ख्वाजा अहमद उर्फ याका (वय ४६, रा. हैद्राबाद, तेलंगणा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याकुबअलीने झायसोल इंटीग्रेटेड सोल्यूशन्स प्रा. लि. खासगी वित्तीय संस्थेचे पुण्यात कार्यालय सुरू करायचे आहे. वित्तीय संस्थेच्या कार्यालयासाठी जागा हवी आहे व वित्तीय संस्थेचे कार्यालय सुरू करण्यास मदत करतो, असे आमिष व्यावसायिकाला दाखविले.
दरम्यान, वित्तीय संस्थेकडून कर्ज पुरवठा केला जात असून व्यवसायात मोठा नफा मिळतो, असे सांगितले. व्यावसायिकाने याकुबअलीला वेळोवेळी एक कोटी ३४ लाख ५४ हजार रुपये दिले. मात्र पैसे देऊन देखील त्यांना परतावा देण्यात आला नाही त्यानंतर आपणी फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस करत आहेत.