लोणी काळभोर : भारत पेट्रोलियम कंपनीतून टँकरचालक डिझेल चोरीचे प्रकरण ताजे असतानाच, आज सोमवारी (ता. २९) लोणी काळभोर येथील हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीमध्ये इंधन वाहतूकदारांच्या गाड्यांवर वजन-मापे विभागाची छापेमारी सुरु आहे. यामुळे लोणी काळभोरसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हे छापे हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने टाकल्याचे बोलले जात आहे.
इंधन चोरीच्या प्रकरणात संशयित असणाऱ्या वाहतूकदारांचे टँकर ताब्यात घ्याण्याचे चालू असून, याबाबतची नेमकी माहिती पुढे आलेली नाही. मात्र छापे चालू असल्याची मोठी चर्चा सुरु आहे.
दोन महिन्यापूर्वी पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने पुर्व हवेलीमधील तेल कंपन्याच्या डेपोतून इंधन चोरी होत असल्याच्या संशयावरुन, महिनाभरापुर्वी तरडे परीसरात कारवाई केली होती. या कारवाईची चौकशी अद्यापही चालु असुन, पोलिसांनी भारत पेट्रोलियम कंपनीच्या डेपोमधील तब्बल एकविस टँकर चौकशीसाठी ताब्यात घेतले आहेत. याप्रकरणात मोठी रेंड आहेत. हि चर्चा चालू असतानाच आजचे छापे पडल्याने इंधन चोरी होत आहे. हे नक्की झाले आहे.
दरम्यान, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हे छापे वजन-मापे विभागाने टाकले आहे. याबाबतची नेमकी माहिती थोड्याच वेळात समजणार आहे.
सविस्तर वृत्त थोड्याचवेळात