पुणे : पुणे स्टेशन परिसरातून अज्ञाताने ७ वर्षीय चिमुकीलचे अपहरणकरून लैंगिक शोषण करण्यात आल्याची खळबळजनक घटना सोमवारी (ता. ०८) दुपारी उघडकीस आली आहे. त्यामुळे या घटनेने पुणे स्टेशनसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात चिमुकलीच्या वडिलांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर पोस्को व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिमुकलीच्या वडिलांचा पुणे रेल्वे स्टेशन परिसरात चहाचा स्टॉल आहे. त्यांना जेवणाचा डबा देण्यासाठी चिमुकली सोमवारी दुपारी घरातून निघाली होती. वडिलांना डब्बा देऊन परत घराकडे निघाली होती. परत निघाल्यानंतर अज्ञाताने तिला उचलून नेत तिचे अपहरण केले. तसेच, तिला फलाट क्रमांक ६च्या भिंतीलगत कंन्स्ट्रक्शन ऑफिसच्या शेजारील रेल्वेच्या बंद असणाऱ्या आयओडब्ल्यु ऑफिसमध्ये नेहून तिचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला. चिमुकली ओरडू लागल्यानंतर आरोपीने तिला जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
दरम्यान, चिमुकलीने लघुशंका करण्याच्या बहाण्यानं नराधमाच्या तावडीतून बाहेर आली अन् पळून आली. तिने थेट घर गाठत आईला घटनेची माहिती दिली. त्यानंतर आईने वडिलांना माहिती दिली. त्यानंतर ते पोलिस ठाण्यात धाव घेत आले व घडलेल्या घटनेबाबत पोलिसांना माहिती दिली. घटना समजताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणीकरून आरोपीचा शोध घेतला जात आहे. या घटनेने पुणे शहर हादरले असून, महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अधिक तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत.