यवत (पुणे) : बोरीऐंदी (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या २२ वर्षीय तरुण विहरीत बुडाल्याची घटना शुक्रवारी (ता. ०९) सहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.
संकेत सहदेव म्हेत्रे (वय-२२, रा. बोरीऐंदी ता. दौंड) असे तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संकेत म्हेत्रे हा विहिरीत बुडून तीन तासाहून अधिक वेळ झाला असून घटनास्थळी यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार, पोलिस उपनिरीक्षक पद्मराज गंपले यांनी भेट दिली असून मदत कार्य सुरू आहे. आज गणपती विसर्जन करताना तालुक्यातील इतर मंडळांनीही काळजीपूर्वक गणपती विसर्जन करावे असे आव्हान बोरीऐंदी गावचे माजी सरपंच राजेंद्र खंडेराव तावरे यांनी केले आहे.