उरुळी कांचन (पुणे) : सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत एका १९ वर्षीय नवविवाहितेने नवरा-बायकोच्या किरकोळ भांडणावरून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (ता. १९) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.
वैष्णवी हनुमंत कळसाइत (वय-१९. रा. मूळ रा. झरे, ता. करमाळा, जि. सोलापूर, सध्या सोरतापवाडी, ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहिते नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णविचे आई-वडील हे लोणी काळभोर येथील राहिंज वस्ती या ठिकाणी राहतात. वैष्णवी व हनुमंत यांचा मागील सहा महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. मागील आठ दिवसापूर्वी वैष्णवी व हनुमंत हे कामानिमित्त सोरतापवाडी या ठिकाणी रहायला आले होते. यावेळी हनुमंत व वैष्णवी या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून भांडणे झाली.
दरम्यान, या भांडणाच्या रागातून वैष्णवीने सोरतापवाडीतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. नातेवाईकांनी तात्काळ लोणी काळभोर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले केले. वैद्यकीय तपासणीत तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.