पुणे : पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला एका लॉजवर नेऊन ६ जणांनी वारंवार सामुहिक बला-त्कार केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील चतुःशृंगी परिसरात घडली आहे. याप्रकरणी ६ नराधमांना चतुःशृंगी पोलिसांनी अटक केली आहे. सदर प्रकार हा जुलै २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत घडला आहे.
ओम राजू तिंबोळे, जय राजू तिंबोळे, अनिल जाधव, सुनील जाधव, शुभम आणि किरण जावळे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनिल जाधव याने पिडीत अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवून विशाल नगर येथील एका लॉजवर नेले. त्यानंतर तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. आरोपीने त्या क्षणांचे फोटो काढले. नंतर हेच फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन इतर आरोपींनी तिच्यावर बाणेर आणि औंध परिसरात पुन्हा सामूहिक बलात्कार केला.