पुणे : पुण्यातील भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्याकडे यांच्याकडे ५ लाखाच्या खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तर पैसे न दिल्यास दीर माजी नगरसेवक दीपक मिसाळ यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. हा प्रकार १८ ते २३ सप्टेंबर या दरम्यान घडला. याप्रकरणी एका व्यक्तीच्या विरोधात बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
इम्रान समीर शेख (रा. विकास नगर, घोरपडी गाव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी दीपक मिसाळ यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माधुरी मिसाळ भाजपाच्या विद्यमान आमदार आहेत. त्यांचे नागरिकांच्या सेवेसाठी जनसंपर्क कार्यालय आहे. मिसाळ यांनी जनसंपर्कासाठी दिलेल्या मोबाईलवर आरोपी इम्रान शेख याने खंडणीसाठी मेसेज केले आहेत. या नंबर वरून त्याने गुगल पे द्वारे दोन-तीन आणि पाच लाख रुपयांची वारंवार मागणी केली. हे पैसे न दिल्यास माधुरी मिसाळ यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
त्यानंतर आरोपी शेख हा दररोज मेसेज करून आमदार मिसाळ यांना त्रास देत होता. तसेच आरोपीने आमदार माधुरी मिसाळ यांचे दीर माजी नगरसेवक दीपक मिसाळ यांना पैसे न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी दीपक मिसाळ यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
दरम्यान, आरोपी इम्रान शेख याच्याविरोधात चंदननगर पोलीस ठाण्यात आयपीसी 386, आयटी ॲक्ट कलम 66 (सी) यानुसार गुन्हा दाखल केला आहे. शेख याच्याविरुद्ध अशाप्रकारचे अजून काही गुन्हे चंदननगर पोलीस ठाण्यात दाखल आहेत, असे पोलिसांनी सांगितले आहे.