मुंबई : देशातील विविध पंचतारांकित हॉटेल्समध्ये पॉर्न फिल्मचे शूटिंग करून त्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्यात येत असल्याच्या प्रकरणामध्ये उद्योगपती राज कुंद्राच्या विरोधात महाराष्ट्र सायबर क्राईम ब्रांचने तब्बल ४५० पानांचे चार्जशीट दाखल केले आहे.
या प्रकरणात उद्योगपती राज कुंद्रा, निर्माता मीता झुनझुनवाला, मॉडेल शर्लिन चोप्रा, पूनम पांडे व कॅमेरामन यांच्यावर महाराष्ट्र सायबर क्राईम ब्रांचने आरोप ठेवले असल्याचे चार्जशीटमध्ये म्हणण्यात आले आहे.
पोलिसांनी या वर्षाच्या सुरुवातीला उद्योगपती राज कुंद्रा यांचे नाव समोर आल्यानंतर तपासाला जोरदार सुरुवात केली होती. तपासामध्ये उघड झालेली माहिती धक्कादायक आहे.
या सर्व प्रकरणामध्ये राज कुंद्रा याने आपल्या ब्रिटन येथील भावासोबत केनरिन नावाची कंपनी स्थापन केली होती. या कंपनीच्या माध्यमातून पॉर्न फिल्मचे चित्रीकरण करून कंपनीच्या पेड अँपच्या माध्यमातून ओटीटीद्वारे पॉर्न सिनेमे दाखविले जायचे.
भारतीय सायबर विशेष कायद्यातून वाचण्यासाठीच कुंद्राने परदेशात कंपनी स्थापन केली होती.