पुणे : पुण्यातील वाघोली परिसरात एक संतापजनक घटना घडली आहे. एका तीन वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी 25 वर्षीय नराधमाला लोणीकंद पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हा प्रकार सोमवारी 25 मार्च रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. त्यावरून बालाजी बोयवार (वय-25 रा. वाघोली) याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्य़ादी या वाघोली येथील एका बांधकाम साईटवर काम करतात. सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांची तीन वर्षाची मुलगी झोपली होती.
त्यावेळी आरोपी त्याठिकाणी आला आणि त्याने फिर्यादी यांच्या मुलीसोबत अश्लील वर्तन करुन विनयभंग केला, असल्त्यांयाची फिर्नीयाद लोणीकंद पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यावरून आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.