मुंबई : गुजरातमधील बोटाड जिल्ह्यातील रोजिद गावात कथितरित्या बनावट दारू पिल्याने २८ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर २० जन गंभीर आजारी पडल्याची घटना घडली आहे. त्यांना उपचारासाठी विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गुजरात दहशतवादविरोधी पथक (ATS) आणि अहमदाबाद क्राइम ब्रँच अशा दोन तुकड्या तयार करण्यात आल्या आहेत. गुजरातचे पोलिस महासंचालक आशिष भाटिया यांनी दिलेली माहिती अशी आहे, सकाळी दोन जणांचा मृत्यू झाला होता. तर पाच जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर उपचारादरम्यान आणखी तीन जणांचा मृत्यू झाला. प्रकरण गंभीर असल्याने पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. तसेच ज्याचा मृत्यू झाला आहे. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी देण्यात आला आहे. डॉक्टरांनी रिपोर्ट जाहीर केल्यानंतर नेमका कशामुळे मृत्यू झाला याची माहिती मिळेल.
बोटाड जिल्ह्यातील पाच आणि अहमदाबाद जिल्ह्यातील धंधुका तालुक्यातील दोन गावातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. किमान 20 बाधित रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. त्यापैकी बहुतेकांना भावनगर येथील सर तख्तसिंहजी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील काहींची प्रकृती चिंताजनक आहे असल्याची माहिती बोटाडचे पोलिस अधीक्षक करणराज वाघेला यांनी दिली.
दरम्यान, गुजरात एटीएस सोबतच अहमदाबाद क्राइम ब्रँच देखील तपासात सहभागी झाली आहे. काही गुन्हेगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस त्यांच्यावर गरज पडल्यास खुनाचा आरोपही जोडण्याची शक्यता आहे.