हडपसर : हडपसर या ठिकाणी काम असून मित्र घ्यायला येणार आहे. असे सांगून बाहेर पडलेल्या मांजरी (बु) (ता. हवेली) येथील २४ वर्षीय तरुण गेला तो परत आला नाही. याप्रकरणी त्यांच्या भावाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
करण दत्तात्रय सुर्यवंशी (वय-२४, रा. देऊळगावराजे, ता. दौंड) असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा भाऊ विकी दत्तात्रय सुर्यवंशी (वय-२८, रा. सदर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. २७) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास करणचा मित्र आदेश वाघमोरे यास क्षेत्रीय कार्यालय हडपसर येथे काम आहे. व तेथे माझा मित्र संकेत हा मला घेण्यास येणार आहे. असे सांगून माणीक मोबाईल शॉपी हडपसर गांव येथुन कोठेतरी निघुन गेला तो परत आला नाही.
करणचा हडपसरसह परिसरात नातेवाईकांनी आजुबाजूच्या परिसरात, मित्रमंडळी, नातेवाईक यांच्याकडे मोबाईल फोनवरून संपर्क करून विचारपूस केली मात्र शोध घेतला मात्र सापडला नाही. याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात विकी सुर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बेपत्ता झाल्याची खबर दिली आहे.
दरम्यान करणचा चेहरा गोल, रंग काळा सावळा, नाक-सरळ, अंगाने मजबुत उंची ६ फुट, दाढी वाढलेली. भुवयांचे केस थोडे जुळलेले, नेसणीस पाढऱ्या काळया रंगाचा पटयाचा शर्ट, काळया रंगाची पॅन्ट, पायात बूट हिंदी, इंग्रजी, मराठी भाषा बोलता येते. या तरुणाबाबत माहिती मिळाल्यास हडपसर पोलिस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन सहायक पोलीस उपनिरीक्षक जे.टी. शिंदे यांनी केले आहे.