पुणे : पुण्यातील वाघोली परिसरातून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. अल्पवयीन मुलाकडून १४ वर्षाची मुलगी गर्भवती राहिल्याचा प्रकार समोर आला आहे. दोघेही अल्पवयीन, शेजारी शेजारी राहणारे, एकमेकांशी शारीरीक जवळीक वाढल्याने ही घटना घडली आहे. याबाबत पिडित मुलीच्या आईने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून शेजारी राहणार्या अल्पवयीन मुलावर पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २० ऑगस्ट २०२४ पासून गेल्या तीन महिन्यापासून सुरु होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगा आणि पिडित १४ वर्षाची मुलगी हे शेजारी शेजारी राहण्यास आहेत. शेजारी रहात असल्याने ते एकमेकांच्या ओळखीचे होते. वाढत्या वयात त्यांच्यात एकमेकांविषयी शारीरीक आकर्षण निर्माण झाले. त्यातून फिर्यादीच्या घरी त्यांच्यात शरीरसंबंध झाले. त्यातून ही मुलगी गर्भवती राहिली. मुलीच्या आईच्या लक्षात हा प्रकार आला होता, मात्र तोपर्यंत मुलगी अडीच महिन्याची गर्भवती राहिली होती. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अहिरे करीत आहेत.