Tuesday, September 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गणोशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लोणी काळभोर, कोंढवा, वानवडीतील 10 गुन्हेगार तडीपार…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 20 August 2025, 21:42

पुणे : शस्त्राचा धाक दाखवून दहशत निर्माण करणे, दरोडे टाकणे, पिस्टल जवळ बाळगणे, गावठी हातभट्टीची दारू विक्री करणे अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या लोणी काळभोर, कोंढवा आणि वानवडीतील 10 गुन्हेगारांना पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचा आदेश दिला आहे.

कोंढवा परिसरातील टोळी प्रमुख करीम सय्यदअली सौदागर ऊर्फ लाला (वय 29, रा. मेट्रो टॉवर, कोंढवा खुर्द) याच्यासह शाहरुम रमजान पठाण ऊर्फ फतेह (वय 25, रा. भाग्योदयनगर, कोंढवा), अझहर बशीर शेख (वय 35, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) आणि अझहर इरफान शेख ऊर्फ अज्जु (वय 28, रा. भाग्योदयनगर, कोंढवा) या टोळीतील सदस्यांवर बेकायदा हत्यार जवळ बाळगणे, दुखापत करणे, मारहाण करणे, धमकावणे, जबरी चोरी, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, चोरी अशा स्वरूपाचे एकूण 7 गुन्हे दाखल आहेत. या चौघांना दोन वर्षांसाठी पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.

वानवडीतील टोळी प्रमुख राहुल ऊर्फ विकी रामु परदेशी (वय 35, रा. वानवडी गाव), विशाल राजू सोनकर (वय 26, रा. वानवडी गाव), सुनिल रामु परदेशी (वय 30, रा. वानवडी गाव) यांच्यावरही दुखापत करणे, मारहाण करणे, शिवीगाळ करणे, धमकावणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, गंभीर दुखापत करणे आणि बेकायदा हत्यार जवळ बाळगणे असे सात गुन्हे दाखल आहेत. या तिघांनाही दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.

लोणी काळभोर परिसरातील अनिकेत गुलाब यादव (वय 22, रा. कदमवाकवस्ती, लोणी काळभोर) याच्यावर बेकायदेशीर जमाव जमवणे, शस्त्र बाळगून दहशत निर्माण करणे, दरोडा टाकणे, मारहाण करून धमकावणे, जबरी चोरी करणे आणि बेकायदेशीर अग्निशस्त्र जवळ बाळगणे अशा पाच गुन्ह्यांची नोंद आहे.

 

त्याचप्रमाणे, लोणी काळभोरमधील प्रसाद ऊर्फ बाबु धनाजी सोनवणे (वय 21, रा. नायगाव रोड, थेऊर) याच्यावर बेकायदेशीर हत्यार जवळ बाळगणे आणि दरोड्याची तयारी करणे असे तीन गुन्हे आहेत.

दरम्यान, कोंढवा खुर्दमधील विश्वजीत भिमराव गायकवाड (वय 40, रा. भिमनगर, कोंढवा खुर्द) याच्यावर बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारू विक्री करण्याचे चार गुन्हे दाखल असून त्यालाही दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे संबंधित भागातील नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

मृत्यू दाखला काढण्याचे नियम बदलले! १ ऑक्टोबरपासून डेथ सर्टिफिकेट मिळवणे होणार अत्यंत कडक

Monday, 28 September 2026, 22:58

दिवाळी-छठसाठी पुणे रेल्वे विभागाचा मोठा निर्णय; २१६ विशेष फेऱ्या सुरू

Monday, 28 September 2026, 22:27

वर्षानुवर्षे रखडलेला बाणेर-पाषाण लिंक रोड आता पूर्णत्वास येणार; वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्याची चिन्हे

Monday, 28 September 2026, 21:50

साडेसतरानळीत पोलिसांच्या वाहनांसारख्या गाड्यांचा वापर? पुनावाला ग्रुपच्या सुरक्षा रक्षकांवर गंभीर आरोप; अमोल नाना तुपे यांच्याकडून चौकशीची मागणी

Monday, 28 September 2026, 20:56

‘झोपडपट्टींत राहून मुलांचं वळण बिघडलं’ मोठ्या भावाने वेगळं राहण्याची भाषा करताच लहाण्याचं डोकं फिरलं; भावाच्याच पोटात चाकूने वार केला अन्…

Monday, 28 September 2026, 20:15

सुनेत्रा पवारांसमोरच माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभेत राडा! सभासद आणि व्यवस्थापनात बाचाबाची; तणावामुळे बैठकीत गोंधळ

Monday, 28 September 2026, 19:37
Next Post

शिरूर न्यायालयाचा निकाल; आरोपीला सहामहिन्यांच्या सक्त मजूरीची शिक्षा....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp