Monday, November 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पूर्णेकरांच्या हत्येसाठी 5 कोटींचा सौदा! मुख्य आरोपी ‘टल्ली’ पोलिसांच्या ताब्यात; 5 कोटींची सुपारी अन् ‘मास्टरमाइंड’ चा होणार पर्दाफाश

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 10 October 2026, 17:18

पुणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या ठाणे गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. पोलिसांच्या पथकाने उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून मुख्य आरोपी संतोष कनोजिया उर्फ ‘टल्ली’ आणि त्याचा साथीदार अमित सिंग याला ताब्यात घेतले आहे. यांच्या अटकेमुळे या हत्येमागचा मुख्य मास्टरमाइंड कोण, याचा उलगडा होणे सोपे होणार आहे. या प्रकरणात राजकीय व्यक्तीचे नाव आणि सुमारे 5 कोटी रुपयांच्या सुपारीची चर्चा रंगली आहे, ज्याबाबत कोठडीतील चौकशीत महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पूर्णेकर यांची हत्या केल्यानंतर आरोपींनी आपले मोबाईल बंद केले होते आणि गुप्तपणे पसार झाले होते. गेल्या 6 दिवसांपासून ठाणे पोलीस उत्तर प्रदेशात ठाण मांडून होते. प्रयागराजमधील व्हीव्हीआयपी घाट परिसरात लपलेल्या या दोघांना तेथून पकडण्यात आले. आरोपींना स्थानिक पातळीवर कोणी निवारा दिला आणि पळून जाण्यास कोणी मदत केली, याचा शोध घेणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.

ठाणे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित सिंग मूळचा उत्तर प्रदेशचा असून तो मीरा-भाईंदर परिसरात ऑटो रिक्षा चालवत असे. एका साध्या रिक्षाचालकाचा या भयंकर कटात सहभाग उघड झाल्याने, ही हत्येची घटना अत्यंत नियोजनबद्ध रीतीने रचल्याचे निष्पन्न होत आहे. या घटनेमागे एखाद्या मोठ्या गुन्हेगारी सिंडिकेटचा किंवा व्यावसायिक मारेकऱ्यांचा हात होता का, या दिशेने तपास सुरू आहे.या गुन्ह्यात आधीच तिघांना पकडण्यात आले होते; मात्र ते तपासात टाळाटाळ करत होते..

दरम्यान, गुन्ह्यात वापरलेली अल्टो कार नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालय परिसरातून जप्त करण्यात आली असून, फरार असताना वाहने बदलण्यात आली होती का, याचाही शोध घेतला जात आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

उरुळी कांचन येथे हॉटेल व्यवसाय की दारूचे अड्डे? अवघ्या दोन ठिकाणीच पोलिसांची कारवाई ; बाकी ठिकाणे बिनबोभाट धंदे सुरु..

Monday, 16 November 2026, 18:49

‘मफलरवाले नेते फडणवीस’ या रोहित पवारांच्या विधानानंतर भाजप आक्रमक! ‘पत्रकार परिषदा घेता, पण पुरावा देत नाही’ म्हणत हल्लाबोल…

Monday, 16 November 2026, 18:26

उरुळी कांचन येथील तळवडी चौकातून सुझुकी अ‍ॅक्सेस चोरीला! चावी गाडीला राहिल्याने चोरट्याने घेतला फायदा

Monday, 16 November 2026, 18:09

केडगावात पैशांच्या वादातून मेव्हण्यांकडून भावजीला लोखंडी रॉडने मारहाण

Monday, 16 November 2026, 18:07

Saswad News : विहिरीच्या पाण्यावरून चुलत भावांमध्ये राडा; दगडफेकीत आर्थिक नुकसान

Monday, 16 November 2026, 18:04

‘मफलर मॅन’ म्हणून रोहित पवारांनी दाखवला फडणवीसांचा फोटो! म्हणाले “या व्यक्तीने घातपात केला असं..” महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप

Monday, 16 November 2026, 17:59
Next Post

तुला आज्जीच्या अंत्यसंस्काराला जायचं की आंदोलनाला? दिल्ली पोलिसांनी दिपकेला कोंडीत पकडलं; २ पर्याय दिले अन्...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp