Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सहावीच्या विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या वर्गशिक्षकाला भिगवण पोलिसांनी ठोकल्या बेड्या ; शैक्षणिक क्षेत्राला काळिमा फासणारी घटना…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 18 August 2022, 21:17

सागर जगदाळे

भिगवण:- शिक्षक हा समाज परिवर्तन करणारा घटक आहे. भविष्यातले विचारवंत, कलाकार, लेखक, तत्त्वज्ञ, पुढारी, डॉक्टर, प्राध्यापक, इंजिनीयर, शास्त्रज्ञ तयार करण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये असते. ज्या प्रमाणे मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देऊन त्यापासून एखादी प्रतिकृती तयार करत असतो, अगदी त्याचप्रमाणे शिक्षक बालकांच्या कोर्‍या मनावर योग्य संस्कार करून त्यातून भविष्यातील जबाबदार नागरिक घडवित असतात. आपल्या आई-वडीलांनंतर शिक्षक हे आपले अप्रत्यक्षरित्या पालकच असतात. पण याच गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना भिगवण (ता.इंदापूर) शहरातील जिल्हा परिषद शाळेमध्ये घडलेली आहे. वर्ग शिक्षकाने सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत पीडित मुलीच्या आईने भिगवन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपी दादासाहेब अंकुश खरात (वय-४२ रा. कल्याणी नगर   RTO ऑफिस च्या जवळ बारामती तालुका बारामती जिल्हा पुणे) याला अटक केली आहे.

 

भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दादासाहेब खरात  हा भिगवण मधील जिल्हा परिषद शाळेत पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत आहे. खरात हे इयत्ता सहावीचे वर्गशिक्षक आहे. आरोपीने मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून पीडित विद्यार्थिनीचा बुधवारी (ता.१७) विनयभंग केला.

त्यानंतर सदर मुलीने हा प्रकार घरी सांगितल्यानंतर आज गुरुवारी (ता.१८) ऑगस्ट रोजी शाळेत पालक गेले असता सदर निंदनीय प्रकार उघडकीस आला. शाळेमध्ये त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या घटनेची माहिती मिळताच भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी शाळेत जाऊन परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्याचा प्रयत्न केला. आणि आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीवर गुन्हा रजिस्टरी दाखल करून सदर गुन्हयाचा वर्दी रिपोर्ट मा जे.एम. एफ सी सो कोर्ट इंदापुर यांना पाठविण्यात आला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.

दरम्यान, सदर शिक्षकाकडून यापूर्वी एप्रिल 2022 मध्ये ही अशाच प्रकारची सदर घटना घडलेली होती पण ही घटना शाळेच्या मुख्याध्यापिका व अधिकारी यांनी उघडकीस न आणता सदर शिक्षकाकडून माफी लिहून समज दिली होती. जर त्याच वेळेस ही घटना उघडकीस आणली असती तर आणि अन्य मुलींचा विनयभंग करण्या चे धाडस दाखविले नसते. अशा प्रकारच्या निंदनीय घटनेला जर वेळेतच लगाम घातला असता व शाळेच्या मुख्याध्यापिकेने ही घटना पोलिसांच्या कानावर ती घातली असती तर आजची घटना घडली नसती.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

5.5 वर्षे पगारच दिला नाही! पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूट वादात; शिक्षकांचे वेतन थकवल्याप्रकरणी संस्थापकासह 7 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 10:55

शेतातील ट्रान्सफॉर्मर फोडून 40 किलो तांब्याच्या कॉइलची चोरी; शिरूरमध्ये खळबळ

Saturday, 4 July 2026, 10:33

‘शेतात सोन्याचा हंडा सापडला’ म्हणत विकली 1,000 नाणी; 5 लाख दिल्यानंतर पिशवी उघडताच वाहनचालकाला बसला धक्का

Saturday, 4 July 2026, 10:25

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40
Next Post
vacancy in pune air force school pune

JOB : कोकण रेल्वेमध्ये अभियंता पदाच्या नोकरीची उत्तम संधी...!  

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.