पुणे : शारीरिक संबंध ठेवण्यासाठी नकार दिल्याने अल्पवयीन मुलीवर अॅसीड फेकण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना रविवारी (ता. २९) रोजी घडली आहे. याप्रकणी चतु:श्रृंगी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
अक्षय राजू चव्हाण (वय. २४, रा. वडारवाडी) असे अटक तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी एका महिलेने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अक्षय चव्हाण फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करत होता. आपण दोघे फिरायला जाऊ, शारीरिक संबंध ठेऊ असे म्हणाला असता, मुलीने नकार दिल्यावर त्याने थांब तुझ्या अंगावर अॅसीड टाकतो, असे म्हणून तिच्या अंगावर द्रव फेकले. दुदैवाने ही मुलगी लांब पळाल्याने तिच्या अंगावर त्यातील काही थेंबच उडाले. यानंतर मुलगी भयंकर घाबरली, तिने याबाबत घरी सांगितले.
मुलीच्या मुलीच्या आईने याप्रकणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अक्षय चव्हाण याला अटक केली. आरोपी अक्षय चव्हाण याची चौकशी केली असता त्याने तिला घाबरविण्यासाठी हा प्रकार केला असल्याचे सांगून, प्रत्यक्षात ते अॅसीड नसून टॉयलेट क्लिनर होते असे सांगितले. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत याप्रकणी कारवाई केली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.