पुणे : जागेच्या वादातून दोन गटात फ्री स्टाईलने तुंबळ हाणामारी झाल्याचा धक्कादायक प्रकार येरवड्यातील शिवराज चौकाच्या रस्त्यावर उघडकीस आली आहे. आणि सदर हाणामारीचा व्हिडीओ सद्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
या मारहाणीत मुक्तार सिंग भादा यांच्यासह इतर गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही गटांनी एकमेकंना लाकडी काठीने मारहाण केली आहे. या हाणामारीत अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. मारामारी करणारे सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच जागेच्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे.
येरवडा येथील दोन गटातील तुंबळ हाणामारीचा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा :
दरम्यान, ‘क्राइम’ करणाऱ्या गुन्हेगारांना वेळीच कायद्याचा बडगा दाखविला नाही, तर त्याची मोठी किंमत सर्वसामान्य नागरिकांना चुकवावी लागते. गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यासोबतच रस्त्यांवर घडणाऱ्या किरकोळ घटनांवर वचक ही तेवढीच महत्वाची आहे. त्यातूनच गंभीर गुन्ह्यांचा जन्म होत असल्याने त्या तातडीने सोडवण्याची गरज आहे. गुन्हेगारांवरील धाक हाच पोलिसांचा मुख्य आधार असतो, परंतु, येरवडा येथील सदर प्रकारामुळे पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिला नाही. आणि पोलिसांचे कायदा व सुव्यवस्थेवर नियंत्रण राहिले नाही. अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.