लोणावळा : आज पहाटे पुन्हा एकदा पुणे मुंबई एक्सप्रेसवे वर अपघात झाला असून यात तीन ट्रकने एकमेकांना धडक दिली असून त्यापैकी एक ट्रक दरीत कोसळला. या दरीत कोसळलेल्या ट्रकमधील चालकाला सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.
आज पहाटे चारच्या सुमारास बोरघाट येथे हा भीषण अपघात झाला असून यात तीन ट्रकने एकमेकांना धडक दिली. यात एक ट्रक मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर ही धडक झाल्यावर ट्रक सुमारे १०० फूट दरीत कोसळला.
त्याबरोबरीने दुसऱ्या ट्रकची देखील केबिन दरीत कोसळली. यातील चालकाचे प्राण वाचविण्यात यश मिळाले असून तिसरा ट्रक महामार्गावरच पलटी झाला.
पहाटेच्या वेळी अपघात झाला असला तरी महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. यावेळी वाहतूक व महामार्ग पोलिसांनी तातडीने वाहतूक कोंडी मोकळी करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. सध्या वाहतूक कोंडी नसली तरी महामार्गावर पडलेला ट्रक हटविण्यात आला आहे